Responsive image

Press Information Bureau

Government of India

Prime Minister's Office

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली, पंतप्रधानांनी “एकता दौड”ला हिरवा झेंडा दाखवला

Posted On :31, October 2017 10:15 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत पटेल चौक येथे सरदार पटेल यांच्या पुतळयाला पुष्पांजली अर्पण केली.

त्यानंतर पंतप्रधानांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथून “एकता दौड”ला हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सरदार पटेलांचे योगदान, विशेषत: देश अखंड राखण्यातील योगदानाचा विशेष उल्लेख केला.

भारतातील तरुण सरदार पटेल आणि राष्ट्र निर्मितीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा आदर करतात असे पंतप्रधान म्हणाले.

भारताला आपल्या विविधतेचा अभिामान आहे आणि एकता दौड सारखे प्रसंग अभिमान आणि एकतेची भावना पुन्हा दृढ करण्याची संधी आपल्याला देतात असे पंतप्रधान म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आज पुण्यतिथी असून नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी एकता दौडमध्ये सहभागी झालेल्याना शपथ दिली.

N.Sapre/S.Kane/Anagha