Responsive image

Press Information Bureau

Government of India

Ministry of Home Affairs

31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’

Posted On :27, October 2017 14:25 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे येत्या 31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जाणार आहे. देशाची एकता, एकात्मता आणि सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि अबाधित राखण्याप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत सकाळी सात वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल यांना पुष्पांजली अर्पण करणार असून, त्यानंतर ते उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देतील, आणि ‘रन फॉर युनिटी’ या धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करतील. या स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, क्रिकेटपटू मिताली राज आणि हॉकीपटू सरदार सिंग सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधेही राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाने दिड हजार रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पोलाद, ऊर्जा, श्रम, पर्यटन तसेच गृहनिर्माण अशा मंत्रालयांनीही एकता दिनानिमित्त अनेक उपक्रम आयोजित केले आहेत.

B.Gokhale/M.Pange/D.Rane