Prime Minister's Office
शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या गौरवार्थ संकेतस्थळाचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन
Posted On :15, August 2017 10:05 IST
स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संकेतस्थळाचे उदघाटन केले.
http://gallantryawards.gov.in/ या संकेतस्थळाची घोषणा करताना ट्विटरवर पंतप्रधान म्हणाले कि या पोर्टलवर आपले शूर पुरुष, महिला, नागरिक आणि सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांच्या यशोगाथांचे संवर्धन केले जाईल.
पंतप्रधान म्हणाले," स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या स्मरणार्थ http://gallantryawards.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर आपले शूर पुरुष, महिला, नागरिक आणि सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांच्या यशोगाथांचे संवर्धन केले जाईल. जर तुमच्याकडे काही माहिती/छायाचित्रे असतील तर ती या पोर्टलवर जोडली जातील. संकेतस्थळावरील फीडबॅक लिंकच्या माध्यमातून कृपया तुमच्याकडील माहिती पाठवा."
A.Sharma/S.Tupe./S.Kane